ब्रेड चीज मॅगी सँडविच

साहित्य-


Sandwich recipe in marathi : 1 मॅगी पॅकेट, चीज, किसून ब्रेड, बटर, ऑरेगानो (ऐच्छिक) तुम्हाला आवडत असेल तर चिली फ्लेक्सही वापरू शकता.

sandwich recipe in marathi


कृती-


एका भांड्यात पाणी ठेऊन आपण रेग्युलर करतो तशी मॅगी बनवून घ्यावी
ब्रेड चा आतील भाग सुरीने नीट काढून घ्यावा. फेकू नका, अथवा तोडून काढू नका, तो आपल्याला लागणार आहे. 
ब्रेड चे काठ असलेला भाग तव्यावर ठेऊन त्यातल्या रिकाम्या भागात बटर लावून घ्या. 
त्या बटर लावलेल्या रिकाम्या भागात केलेली मॅगी चमच्याने पसरून भरा, त्यावर किसलेलं चीज, किंवा चीज स्लाईस ठेवा, त्यावर आरोगनो टाका.
चीज वर आपण ब्रेड मधून काढलेला आतला भाग दाबून बसवा.
ब्रेड च्या कडेने बटर सोडा, वरून ही लावा. अलगद ब्रेड उलटा, दोन्ही बाजूनी खरपूस घ्या.
मधून कट करून सॉस सोबत सर्व्ह करा. 


टीप– हे सँडविच करताना शक्यतो नॉनस्टिक तवा किंवा पॅन वापरावा, म्हणजे नूडल्स खाली चिटकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *