Mattha recipe in marathi : उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाहीलाही ठरलेली असते. मग आईस्क्रिम खा, कुल्फी खा, कोल्ड्रिंक्स प्या हे नेमाने आलंच.
   पण हे सगळे थंड पदार्थ चवीला जरी चांगले असले किंवा तात्पुरता थंडावा देणारे असले तरी, याचे दुष्परिणाम शरीरावरआणि आरोग्यावर दिसून येतात, जसं की सर्दी होणे, रॅश उठणे असे त्रास होतात.
 आपल्या भारतीय खाद्य संस्कृती मध्ये प्रत्येक ऋतू मध्ये शरीराला पोषक पदार्थांची रेलचेल आहे. उन्हाळ्यातही शरीराला थंडावा देण्यासाठी आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, त्यातलाच एक प्रकार आपण आज पाहणार आहोत.. मठ्ठा..mattha in marathi

Mattha recipe in marathi


महाराष्ट्रात जवळपास सगळ्यांच्या घरात ताजे दही लावण्याची पद्धत आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत दही सर्वांना खायला उपयुक्त मानलं जाते. भरपूर कॅल्शियम दह्या मधून मिळते. आणि त्याची आंबट गोड चव सर्वांना आवडते.
ताक हा शरीराला थंडावा देतो. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक साधं पिलं तरी फायद्याचं ठरतं. मठ्ठा पोटभर जेवणानंतर पिल्यास तो अन्न पचनासाठी फायदेशीर ठरतो. तो बनवताना चिमूटभर हिंग आणि छोटा आल्याचा तुकडा अन्न पचन आणखी सुलभ करतो. 


mattha recipe marathi मठ्ठा साहित्य-


500 ग्राम दही, 4 चमचे साखर, 1 चमचा जिरेपूड, 1चमचा मीठ, 3-4 काड्या कोथिंबीर, 3-4 काड्या पुदिना, चिमूटभर हिंग, छोटा तुकडा आलं.


कृती-


mattha masala recipe in marathi दही मिक्सर मध्ये घेऊन त्यात तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार थंड पाणी टाकून त्यात साखर, मीठ, कोथिंबीर, पुदिना , हिंग आणि आलं टाकून मिक्सर वर फिरवून घेणे.
हे मिश्रण एका भांड्यात ओतून घेऊन, त्यात जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. 
जेवताना थंड च सर्व्ह करणे.


(टीप- जर तुम्हाला थोडी स्पायसी  चव हवी असेल तर तुम्ही त्यात अर्धी मिरची मिक्स करताना टाकू शकता.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *