1

Dhokla recipe in marathi : गुजराती पदार्थ कायम अतिशय चविष्ट असतात. बऱ्याच हलवाई दुकांनामध्ये ह्यांची रेलचेल असते. थोडेसे गोडसर, तुपाचा अगदी सढळ वापर करून बनवलेल्या मिठाई असो नाहीतर व्यंजन एकदा खाल्ल्यावर त्याच्या प्रेमात पडणार नाही असं होणारच नाही. Dhokla recipe marathi marathi madhe. हांडवो, उंधियो, खाकरा, मठडी ह्यांच्या सोबत खमण ढोकळा कधी आपला झाला कळलं नाही. आज त्यातल्याच ढोकळ्याबद्दल आपण बोलणार आहोत.


ढोकळा व्यवस्थित करणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते, कारण, बऱ्याचदा प्रमाण पुढे मागे झाले तर एक तर तो कोरडा तरी होतो नाहीतर संपूर्ण शिजत नाही. आम्ही तुम्हाला याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहोत.

Dhokla recipe in marathi


ढोकळा: साहित्य:- 

१ वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा हळद, १ मिरची आणि आलं बारीक चिरून, मीठ चवीनुसार, १ चमचा सायट्रिक ऍसिड किंवा लिंबाचा रस ४ चमचे पिठीसाखर, चिमूटभर सोडा, पाणी
फोडणीचे साहित्य:-2 चमचे तेल,1 चमचा मोहरी,1 चमचा तीळ, कडीपत्ता, साखर पाणी

कृती:-

एका बाऊल मध्ये बेसन, मीठ, हळद, सायट्रिक ऍसिड, पिठीसाखर, मिरची आलं क्रश एकत्र मिसळा.
ह्या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. हे करताना एक लक्षातठेवा की मिश्रण फिरवताना एकाच दिशेने चमचा फिरवा. म्हणजे त्यात हवा तयार होईल, जो आपल्या ढोकळ्याला स्पॉंजीनेस यायला मदत होईल. हळूहळू त्यात पाणी घालून बॅटर तयार करा. मिश्रण जास्त पातळ करू नका.


जवळजवळ 15 मिनिटे फिरवून त्यातल्या गुठळ्या निघाल्या त्याची खात्री करा. आणि हे मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवा.  
तोपर्यंत एक खोलगट आणि पसरट भांड घ्या, त्याला आतून तेल लावून घ्या. गॅस वर एका पातेल्यात थोडं पाणी ठेऊन त्यात एक स्टँड ठेवा.
ग्रीस केलेल्या भांड्यात तयार केलेलं मिश्रण घालण्या आधी मिश्रणात सोडा मिसळा.. आणि एकच डायरेक्शन मध्ये बॅटर थोडावेळ फिरवा. आणि बॅटर भांड्यात ओता. हे भांड पाणी ठेवलेल्या भांड्यात ठेवा. वरून झाकण ठेवा. 
15 ते 20 मिनिटानंतर सुरीने अथवा टूथपिक ने एकदा ढोकळा शिजलाय की नाही त्याची खात्री करून घ्या, शिजला असेल तर सूरी अगदी क्लीन राहील.
शिजल्यानंतर भांड बाहेर काढून थंड करायला ठेवा. तोपर्यंत फोडणी करायला घ्या. 
एका भांड्यात तेल टाकून तापल्या नंतर त्यात मोहरी, तीळ, कडीपत्ता टाकावा, मोहरी तडतडली की गॅस कमी करावा, आणि त्या तेलात थोडं पाणी घालावे. त्या पाण्यात साखर घालावी. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. 
एका ताटात ढोकल्याचं भांड उपडं करून ढोकळा ताटात काढून घ्यावा. त्यावर साखरेचं तयार केलेलं पाणी व्यवस्थित पसरून टाकावं. 
ढोकळ्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून त्याचे काप करा, आणि हिरव्या चटणी सोबत किंवा  चिंचगुळाच्या गोड चटणी सोबत सर्व्ह करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *