1

suvichar marathi मराठी सुविचार

Marathi Suvichar

● marathi suvichar आवडतं ते करू नका, जे करावे लागते त्यात आवड निर्माण करा.
●आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करणे ज्याला जमत नाही तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही.
●तुमच्या वागण्यात बदल करा दुसरे आपोआप बदलतील.
●तुम्हाला आज जे मिळत आहे ते तुम्ही काल हे पेरलं त्याचं फळ आहे.
● सकारात्मक विचार करा, यशस्वी व्हाल.
● आपण कोण आहोत या पेक्षा आपण काय केलं हे महत्वाचे ठरतं.
●संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये.
● दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा गुणाची कदर करायला शिका.
● उगवलेली प्रत्येक सकाळ म्हणजे ईश्वराने खेळण्यासाठी दिलेली एक नवी ‘इनिंग’ समजा.
● तीन गोष्टी सतत देत राहा, मान, दान, आणि ज्ञान.
● वाईट माणसाच्या निवडीने त्रस्त होऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्याचे महत्व कळते.
● स्वतःवर विनोद करायला शिका. नाहीतर दुसऱ्याला संधी मिळते.
● व्यक्ती महान नसते तिने केलेले संघर्ष तिला महान बनवतात.
● संधी चालून येत नाही, ती मिळवावी लागते. 
● जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
● जेव्हा आपणास राग, क्रोध येतो तेव्हा माणसाने आधी त्याच्या परिणामांचा विचार करावा.
● संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
● वाईट काळात नेहमी म्हणावे, हे ही दिवस जातील.
● ज्या दिशेने तुमची मुले जावीत असं तुम्हाला वाटत असेल, त्या दिशेने तुम्ही ही प्रवास करून बघा.
● दिवस चांगल्या तऱ्हेने घालवला तर समाधानाची झोप मिळते.
● विचार कितीही महत्वाचा असला तरी कृती अधिक महत्वाची असते.
● आत्मविश्वास तुम्हाला कदाचित यश देणार नाही, पण आव्हानांना तोंड देण्याची शक्ती नक्कीच देतो.
● संतती साठी संपत्ती निर्माण करू नका. संपत्ती निर्माण करणारी संतती घडवा.
● कोणालाही तेवढ्याच लवकर माफ करा, जेवढ्या लवकर देवाने तुम्हाला माफ करावे अशी तुमची इच्छा असते.

marathi suvichar मराठी सुविचार


● स्पष्टपणे पाहण्यासाठी मन रिकामं असलं पाहिजे.
● खूप मोठे व्हायचे असेल तर लहान बनून जगावे लागेल.
● दुसऱ्यासाठी मागून बघा, स्वतःसाठी मागायची गरज पडणार नाही.
● तुम्ही कसे दिसता यापेक्षा कसे वागता हे महत्वाचे.
● सळसळते रक्त आणि उत्साही मन यशाचे दरवाजे उघडतो.
● माणसाच्या अंगची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीही संपली असे समजावे.
●अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.
●शिकून शहाणा तोच होतो, ज्याला शहाणा व्हायची इच्छा असते.
● हक्कांचा आग्रह धरताना कर्तव्याचा विसर पडू देऊ नका.
● लेखन, वाचन, अन श्रवणाने विचार प्रगल्भ होतात. 
● सखोल विचार आणि कठोर परिश्रम असल्याशिवाय प्रयत्न होत नाहीत.
● उपदेशक, विचारवंत व्हा, पण अगोदर आचारवंत व्हा.
● तुम्ही तुमचे विचार, वाणी, आणि कृती या तिन्ही गोष्टीत प्रामाणिक राहा.
● व्यसन म्हणजे दैन्य, दुःख, दारिद्र्य व रोग यांना आग्रहाचे खास निमंत्रण.
● स्वाभिमान हा सर्व सद्गुणांचा पाया आहे.
● कठीण परिस्थितीला आनंदाने व हसत खेळत तोंड देणाराच थोर गणला जातो.
● नम्रतेने जुळते घेणाऱ्यापाशी फार मोठेपण असते.
● ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय होय.
● यश हे मनाच्या शांतीतून उगम पावत असते.
● तुम्ही जितके कमी बोलाल, तितके जास्त लोक तुमचे ऐकतील.
● खरे तापमान नियंत्रण म्हणजे क्रोधाग्नी विझवणे.
● जर जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावेच लागते, तर मग ते प्रेमाने का देऊ नये..? 
● खोट्या स्वप्नापेक्षा कटू वस्तुस्थिती चांगली.
● प्रेमळ, गोड आणि सत्य बोलण्यासाठी, एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
● संयम तुम्हाला अमर्याद अधिकार देईल.
● विजयाची वेळ नव्हे तर कसोटीची वेळच माणसाला महान बनवत असते.
● तुमची सद्सद्विवेकबुद्धी ही चांगला मित्र आहे. तिचे वारंवार ऐकत जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *