panipuri recipe in marathi : चाट कुणाला आवडत नाही..? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याना चाट आवडतच आवडत. नाही का? 
pani puri in marathi रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी हे सगळयांना आवडणाऱ्या गोष्टी. रस्त्यावर, कॉर्नरवर, नाक्यावर असणाऱ्या गाड्यांवर, मिळणारे हे चाट, सगळ्यांचा जीव का प्राण आहेत.
परन्तु काही लोकांना बाहेर चाट सेंटर वर खाणं आवडत नाही, आणि सध्या बाहेर च खाणं थोडं जिकिरीचं झालं आहे. त्यामुळे बरेच जण हे सगळे चाट मिस करत असतील. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत, चाट मधला अतिशय लोकप्रिय पदार्थ, पाणी पुरी.
चाट मूळचे उत्तर भारतीय, त्यातल्या त्यात पाणीपुरी सगळ्या भारतात मिळते. दिल्ली मध्ये गोलगप्पे,महाराष्ट्र मध्ये पाणीपुरी, बंगाल मध्ये पुचका.. अस संबोधलं जाणार हे चाट,तस पाचक असत असही म्हणू। शकतो. चला तर मग बनवू घरच्या घरी पाणीपुरी pani puri recipe in marathi at home.

pani puri puri recipe in marathi पाणीपुरी पुरी

पाणीपुरी पुरी बनवण्यासाठी साहित्य-


2 वाटी बारीक रवा, 1 चमचा मोहन साठी तेल, 1 चमचा मीठ

कृती-


pani puri recipe in marathi : एका भांडयात रवा घेऊन त्यात मीठ घालावे, आणि एक चमचा तेल कडकडीत तापवून ते रव्या मध्ये घालावे. सर्व व्यवस्थित मिसळून त्यात हळूहळू पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
मळलेलं पीठ 15 मिनिटे झाकून ठेवावे, दुसऱ्या कढईत तेल तापत ठेऊन, एका बाजूला पुऱ्या करायला घ्याव्यात. एकाच मोठी पुरी लाटून एखाद्या छोट्या झाकणाने त्याच्या पुऱ्या काढाव्यात, आणि तेलात तळून घ्याव्यात. आपल्या पुऱ्या तयार.

panipuri recipe in marathi


पाणीपुरीचे तिखट पाणी-


तिखट पाणी साहित्य – 
एक वाटी पुदिना, एक वाटी कोथिंबीर, 4 मिरच्या, 4 पाकळ्या लसूण, 2 इंच आलं, मीठ, 1 चमचा जिरेपुड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा चाट मसाला


कृती-


पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे, वाटताना, त्यात थोडे पाणी घालावे, म्हणजे ते बारीक होईल. 
नंतर ते मिश्रण एका गाळणी मध्ये घेऊन व्यवस्थित गाळून घेणे. राहिलेला चोथा परत मिक्सरमधून वाटून घेणे, तो तसाच पाण्यात मिक्स केला तरी चालेल.नंतर त्यात मीठ, जिरेपूड, धणेपूड, चाट मसाला घालून आणि आवडत असल्यास बुंदी घालून हे तुमच्या गरजेनुसार त्यात पाणी घालून फ्रीज मध्ये ठेऊन द्यावे.


panipuri pani recipe in marathi गोड पाणी-


साहित्य- 


1 वाटी चिंच, 1 वाटी गूळ किसून, अर्धी वाटी खजूर, 1चमचा जिरेपूड, 1चमचा धणेपूड1 चमचा लाल तिखटमीठ चवीनुसार


कृती-


चिंच,गूळ आणि खजूर 4-5 तास आधीच पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर एका पातेल्यात हे सगळं तुम्हाला हवं असेल इतकं पाणी घालून उकळायला ठेवावं. कुकर ला लावलेत तरी चालेल. हे मिश्रण आटवून द्यावे. सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यावे. त्या नंतर, एका गळणीतून हे सगळं पल्प गाळून घ्यावे, राहिलेला चोथा एखाद्या काचेच्या एअर टाईट बरणीत ठेवा, आमटी ला उपयोगी पडते.ह्या चिंचगुळाच्या मिश्रणात जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, आणि मीठ घालून फ्रीज मध्ये ठेवावे. 


पाणीपुरी-पाणीपुरी खाताना, पुरी ला फोडुन, त्यात आधी उकडलेला बटाटा, अथवा उकडलेला रगडा घालून त्यात तिखट चटणी,गोड पाणी, शेव, बुंदी, कांदा कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *