dosa recipe in marathi : दाक्षिणात्य पदार्थामध्ये डोसा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही साध्या किंवा मोठ्या हॉटेल मध्ये गेलात तरी सगळ्यांच्या मेनू कार्ड मध्ये तुम्हाला हमखास दिसणारा पदार्थ म्हणजे डोसा. यात ही बरेच प्रकार आहेत बरं का.. जसं की साधा डोसा, मसाला डोसा, मैसोर डोसा, स्प्रिंग डोसा,टोमॅटो डोसा. आणि बरेच हौशी लोकं यात वेगळे प्रकार पण ट्राय करतात. वेगवेगळ्या पद्धतीने ते यात प्रयोग करत राहतात. आणि हे सगळे प्रकार तेवढेच रुचकर आणि आरोग्यवर्धक राहतील याचीही काळजी घेतात. असाच एक डोस्याचा प्रकार आपण इथे पाहणार आहोत. त्यातही पौष्टिकपणा आणि रुचकरपणा आहे. चला तर मग पाहूया रवा बेसन डोसा.

dosa recipe in marathi
Dosa recipe in marathi

साहित्य: 
१ वाटी रवा

१ वाटी बेसन

१ वाटी दही

२ चमचे तांदळाचे पीठ

मीठ चवीनुसार


कृती: 

Dosa recipe in marathi
१. एका बाऊल मध्ये रवा, बेसन, दही, आणि तांदळाचे पीठ एकत्र करून व्यवस्थित मिसळून घ्यावे. 
२.त्यात मीठ आणि अंदाजे भिजेल इतपत पाणी घालून १५मिनिटे ते झाकून ठेवावे.
३. 15 मिनिटानंतर मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून डोसा बॅटर सारखं पातळ करून घेणे.
४. तवा गॅस वर ठेवल्या नंतर, तो गरम झाल्यावर, त्यावर टिश्यू पेपर ने थंड पाण्याने पुसून घ्यावे.
५. सर्वात आधी एक छोटा डोसा करून पहा. त्यानंतर पहिल्यासारखा टिश्यू पेपर फिरवून डोसे करा.
६. हा डोसा दोन्ही बाजूनी भाजून घ्यावा लागतो. 
७. हा डोसा नारळाची चटणी, शेंगदाण्याची ओली चटणी, किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *