Appe recipe in marathi : साऊथ इंडियन पदार्थ कुणाला आवडत नाही..? जवळपास सगळे नाश्त्याच्या वेळी सर्वात जास्त हेच पदार्थ केले जातात. डोसा, उत्तपा, इडली हे सर्वश्रुत आहेत, पण आप्प म्हणजेच पनियारम हा ही तेवढाच प्रसिद्ध आहे.
आप्पे
साहित्य:
2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे
Appe recipe in marathi कृती:-
सगळ्यात आधी तांदूळ, आणि दोन्ही डाळी मेथी दाण्यासह वेगवेगळे भिजवून ठेवा. सकाळी भिजत घातले तर साधारण 8-9 तास चांगले भिजतात.
नंतर तांदूळ, डाळी मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. वाटलेलं मिश्रण रात्रभर उबदार ठिकाणी ठेऊन द्यावे. जेणेकरून ते व्यवस्थित फरमेन्ट होईल.
पीठ फरमेन्ट झाल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ घालावे, आप्प्या मध्ये बऱ्याचदा हिरवी मिरची बारीक करून, बारीक चिरलेला कांदा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालतात. त्यात थोडे तेल घालून घ्यावे.
गॅस वर आप्पे पात्र ठेऊन थोडं गरम झाल्यानंतर त्यात प्रत्येक साच्यात तेल टाकून घ्यावे. चमच्याने त्या प्रत्येक साच्यात पीठ घालावे, त्यावर ही थोडं तेल सोडावे. आणि झाकण ठेवावे. आप्पे एक बाजूने नीट झाल्यावर ते चमच्याने काळजीपूर्वक उलटावे. उलटताना काटा चमचा वापरा म्हणजे भाजनार नाही. दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजल्यानंतर सगळे आप्पे एकेक करून काढून घ्या.
हिरवी चटणी नाहीतर सॉस सोबत सर्व्ह करा.